प्रगती चषक २०२४
प्रगती सी. सी. चषक २०२४ आयोजित कै. सौ. प्रगती अशोक घरत स्मरणार्थ लेदर बॉल टी-१० गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा शनिवार रविवार (२० आणि २१ एप्रिल) रोजी रानगांव क्रिकेट मैदान येथे आयोजित केलेली आहे. गावातील सर्व क्रिकेट संघाना विनंती करतो की ही टूर्नामेंट यशस्वी करण्याकरिता आपल्या सहकार्याची गरज आहे.
स्पर्धेसाठी अंतिम विजेता व उपविजेता संघासाठी रोख रक्कम तसेच खालील प्रमाणे पारितोषिके असतील.
- अंतिम विजेता (Winner)
- अंतिम उपविजेता (Runner Up)
- उत्कृष्ट खेळाडू x११ (Man of the Match x11)
- स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू (Man of the Series)
- स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ( Best Batsman)
- स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler)
- स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ( Best Fielder)
- एका षटकात हॅट-ट्रिक (Hat-trick)
- एका सामन्यात ५ बळी (5 wickets in a Match)
- बळीसह निर्धाव षटक (Maiden Over with wkts)
- जलद ५० धावा ( Fastest Fifty)
- एका सामन्यात सर्वाधिक धावा (Best Score )
- सर्वाधिक षटकार (Most Sixes)
- सर्वाधिक चौकार (Most Fours)
- उगवता खेळाडू (Emerging Player)
- उत्कृष्ट युवा खेळाडू (Best Youngest Player)
- उत्कृष्ट वयस्कर खेळाडू (Best Senior Player)
- खेळाडूवृत्ती ( Fair Play )
- शिस्तबद्ध संघ (Most Discipline Team)