????????
*चाकण डॉक्टर्स असोसिएशन*
*मिक्स बॉक्स क्रिकेट लीग २.०*
*नियमावली*
१. एकूण १० टीम स्पर्धा खेळतील
२. प्रत्येक टीम ल ३ लीग मॅचेस खेळायला मिळतील.
३. प्रत्येक टीम मधे एकूण १०, ७ पुरुष खेळाडू तसेच ३ महिला खेळाडू असतील.
४. १० खेळाडूंपैकी ९ खेळाडू प्लेइंग असतील,त्यात ६ पुरुष ३ महिला खेळाडू असणे अनिवार्य आहे.
५. प्रत्येक लीग मॅच ही ८ ओव्हर्स ची असेल.
६. Leg byes चे रन्स दिले जातील.
७. LBW दिला जाणार नाही.
८. प्रत्येक NO BALL ला FREE HIT दिला जाईल.
९. रनर दिला जाणार नाही.
१०. UMPIRE चां निर्णय शेवटचा असेल.
फलंदाजी नियम...
१. प्रत्येक लीग मॅच ला दोन OPENERS वेगवेगळे असतील.
२. प्रत्येक मॅच च्या सुरवात एक महिला खेळाडू तसेच एक पुरुष खेळाडू करतील तसेच महिला खेळाडू STRIKE वर असणे अनिवार्य आहे.
३. महिला खेळाडू बाद झाल्यास त्या खेळाडूला पुढील महिला खेळाडूच REPLACE करेल. तसेच पुरुष खेळाडू ला पुरुष खेळाडू REPLACE करेल.
४. Retired hurt झालेली महिला खेळाडू ला तिसऱ्या महिला खेळाडूच्या विकेट नंतर लगेच फलंदाजी करावी लागेल, याची कृपया नोंद घ्यावी.
गोलंदाजी नियम..
१. पुरुष खेळाडू हे UNDER ARM बॉलिंग करतील.
२. पुरुष खेळाडू आखून दिलेल्या बॉक्स च्या मधे उभे राहून, पाय न उचलता (ओघाने टाच ही न उचलता) बॉलिंग करतील, अन्यथा NO BALL देण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी.
३. ८ पैकी ५ ओव्हरस पुरुष खेळाडू आणि ३ ओव्हर महिला खेळाडू टाकने अनिवार्य असेल.
४. पुरुष खेळाडूंच्या ५ पैकी एक खेळाडू जास्तीत जास्त २ ओव्हर टाकू शकतो.
५. महिला खेळाडूंच्या ३ ओव्हर पैकी एक खेळाडू जास्तीत जास्ती २ ओव्हर टाकू शकतो.
६. महिला खेळाडू OVER ARM बॉलिंग करतील, तसेच आखून दिलेल्या बॉक्स च्या आत बाहेर २ पावले पुढे मागे केलेले चालेल.
क्षेत्ररक्षण नियम..
१. यश्टिरक्षकाच्या मागील जाळी स बॉल टप्पा पडून लागल्यास ४ धावा तसेच टप्पा ना पडता डायरेक्ट लागल्यास ६ धावा दिल्या जातील.
२. गोलंदाजाचा मागील जाळीला बॉल टप्पा घेत लागल्यास ४ धावा तसेच डायरेक्ट लागल्यास ६ धावा दिल्या जातील.
३. जाळी त बॉल अडकल्यास किंवा डाव्या उजव्या बाजूच्या जाळी तून बॉल बाहेर गेल्यास १ धाव declered रन म्हणून देण्यात येईल.
४. वरच्या किंवा बाजूच्या कुठल्याही जाळी ला लागून घेतलेला झेल आऊट दिला जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
विशेष नियम..
१. महिला खेळाडूच्या गोलंदाजी वर फलंदाज(महिला पुरुष दोन्हींना लागू) बाद झाल्यास फलंदाजी करणाऱ्या टीम चे ५ रन कमी करण्यात येतील.
२. मॅजिक ओव्हर.
-मॅजिक ओव्हर मधे फलंदाजांनी जेवढे रन काढलेले असतील त्याच्या दुप्पट रन फलंदाजी करणाऱ्या टीमला दिले जातील.
- गोलंदाजी करणारी टीम ठरवेल त्यांना कुठली ओव्हर मॅजिक ओव्हर टाकायची आहे.
- तसेच महिला व पुरुष खेळाडू पैकी कोणीही मॅजिक ओव्हर टाकू शकते, त्याचा निर्णय देखील गोलंदाजी करणारी टीम घेईन.
- मॅजिक ओव्हर मधे महिला खेळाडू ने जर फलंदाज बाद केला तर १० रन कमी केले जातील कृपया ह्याची नोंद घ्यावी.
३. सेमी फायनल आणि फायनल मॅच tie झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येईल. लीग मॅच मधे tie झाल्यास १-१ पॉइंट्स देण्यात येईल.
४. ९ प्लेयिंग खेळाडू नंतर १० वा खेळाडू बॅटिंग फिल्डिंग किंवा बॉलिंग (तिन्ही पैकी एक) करने अनिवार्य आहे.
५. प्रत्येक मॅच वेळेत सुरू होणे ह्याची जबाबदारी प्रत्येक टीम ची आहे, त्यामुळे वेळेत मॅच सुरू न झाल्यास ओव्हर्स कमी करण्याचा अधिकार आयोजकांकडे राखीव असेल.
तरी सर्व टीम owners नी तसेच प्रत्येक खेळाडूने नियमावली व्यवस्थित वाचणे आणि नियमांचा अभ्यास करून त्याचे पालन करणे अनिवार्य आहे.
आपण की स्पर्धा आपल्यातील प्रेम आणि एकोपा वृध्दींगत होण्यासाठी आयोजित करीत आहोत तरी सगळ्यांनी ह्याचा आदर करावा.
तसेच शेवटचे निर्णय हे आयोजकांकडे राखीव असतील ह्याची नोंद घ्यावी.
*स्पोर्ट्स कमिटी*
*चाकण डॉक्टर्स असोसिएशन*
????????