NAME
Harigaon Premier League 2022 (HPL) 2nd Season
DATES
09-Mar-22 to 13-Mar-22
LOCATIONS
Shrirampur (Maharashtra) - NCC Ground, Haregaon
BALL TYPE
TENNIS
नॅशनल क्रिकेट क्लब, हरेगांव तर्फे यावर्षीही *हरेगांव प्रीमिअर लीग 2022* चे आयोजन करण्यात आले आहे..
अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेल्या क्रिकेटपटूंमध्ये दि. 10 ते 13 मार्च दरम्यान NCC क्रिकेट मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम रंगलेला पाहायला मिळणार आहे. मागील वर्षीही *हरेगांव प्रीमिअर लीग* स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला होता.
हरेगांव मधील NCC मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम होणार असून यु ट्यूब च्या माध्यमातून सर्व दर्शकांना घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असणार आहे. यास्पर्धेत श्री. नाजीमभाई शेख यांच्या मालकीचा परफेक्ट मोटर्स, श्री. विष्णुभाऊ औताडे यांच्या मालकीचा माळेवाडी वॉरिअर्स, श्री. आकाशभाऊ सूर्यवंशी यांच्या मालकीचा सूर्या प्रतिष्ठान, श्री. दिपकभाऊ साठे यांच्या मालकीचा एल. एस. व्हिजन, श्री. मंगेशभाऊ पटारे यांच्या मालकीचा पटारे पाटील 11, श्री. अक्षयभाऊ बनकर यांच्या मालकीचा अक्षयभाऊ बनकर पाटील 11, श्री. मनोज शिंदे आणि श्री. नदीम पठाण यांच्या मालकीचा एन. एम. इलेव्हन तसेच मागील पर्वातील विजेता संघ चि. आयुष सुहास धनेधर यांच्या मालकीचा हरेगांव पिंक पँथर असे एकूण आठ संघामध्ये होणारी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
तसेच कोविड 19 च्या पार्श्वभूमीमुळे सर्व नियमांचे पालन करत हा क्रिकेटचा महासंग्राम पार पडणार आहे. हरेगांव प्रीमिअर लीग 2022 चा विजेता कोण होणार या कडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Want to get in touch with the Harigaon Premier League 2022 (HPL) 2nd Season? Download the CricHeroes App!