एका ठिकाणी विविध गावांमध्ये क्रिकेट लिग्स आयोजित केल्या जात असल्याचे पाहून, आपल्या रेवाळे आळीतही अशी स्पर्धा आयोजित करावी, असा विचार उपस्थित झाला. यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली. त्या बैठकीत मी, श्री. भावेश जयवंत वर्तक, अध्यक्ष म्हणून निवडला गेलो आणि कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.
त्याच बैठकीत श्री. अक्षय जयप्रकाश वर्तक यांनी आपल्या दिवंगत वडिलांचे, क्रिकेटपटू कै. जयप्रकाश शंकर वर्तक यांचे स्मरणार्थ या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक होण्याची घोषणा केली.
त्यानंतर २०२१ साली, कमी वेळेतच, रेवाळे प्रीमियर लिग (RPL) यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. आजपर्यंत, या स्पर्धेची परंपरा अखंड सुरू असून, मुख्य प्रायोजकांच्या सहकार्याने यावर्षी या स्पर्धेचे ५ वे वर्ष मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे.